। अहमदनगर। दि.11 जून । नगर-सोलापूर रोड वरून सुमारे तीन वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सहा लाख रुपये किमतीचा डंपर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडून, चोरीचा डंपर विकत घेणार्यास अटक केली. ही कारवाई नगर मनमाड रोड वरील शिंगवे नाईक येथे केली.
या कारवाईत पोलिसांनी जावेद बिबन सय्यद ( वय 32, रा.शिंगवे नाईक तालुका नगर) यास अटक करून त्याच्याकडे सहा लाख रुपये किंमतीचा ढम्पर (क्र.एम.एस. 16 ए बाय 0890 ) ताब्यात घेतला आहे.
यामागील माहिती अशी की अजिंक्य बबन पवार ( वय.24 रा.लक्ष्मी नगर भिंगार) यांच्या मालकीचा सहा लाख रुपये किमतीचा डंपर ( क्र.एम.एच 16 ए.बाय 0890) सोलापूर रोडवरील रणसिंग यांच्या गोडाऊन जवळ ( दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी ) लावला असता अज्ञात चोरांनी चोरून नेला.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शहरात समांतर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना बातमी दाराकडून माहिती मिळाली कि शिंगवे नाईक येथील जावेद सय्यद हा नंबर नसलेला डंपर वापरीत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी माहितीची खात्री केली.
यानंतर शिंगवे नाईक येथील जावेद बिंबन सय्यद याच्या घराशेजारी लावलेला नंबर नसलेल्या डंपर ताब्यात घेतला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने. हा डंपर संदीप वाखुरे (रा.माळी बाभुळगाव तालुका पाथर्डी) व गणेश जाधव (रा.पाथर्डी) यांच्याकडून विकत घेतला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
यावरून पोलिसांनी पाथर्डी येथे जाऊन माळीबाभुळगाव येथील संदीप वाखुरे याचा तपास घेतला असता तो मिळून आला नाही. गणेश जाधव यांची माहिती घेतली असता तो पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी जावेद सय्यद भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक रवी सोनटक्के, शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, आकाश वाघ, मच्छिंद्र बर्डे, संदीप दरंदले यांनी केली आहे