।
अहमदनगर । दि.15 जून । शहरातील रामवाडी येथे 45 वर्षीय व्यक्तीचा मारहाणीत
मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. कचरु दत्तू कांबळे (वय 45,
रा.रामवाडी, नगर) असे मयत व्यक्तीचे नांव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी दोन जणांनी कांबळे यांना
त्यांच्या घरातून उचलून नेले. कांबळे यांना बेदम मारहाण करुन सायंकाळी
पुन्हा घरी आणून सोडले. मारहाणीत कांबळे यांना जबर मार लागल्याने व वेळीच
उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत
मयताचे नातेवाईक यांनी आज सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना
अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी सदर मृत्यदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा
शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
तोफखाना पोलिसांनी आरोपींचा शोध
सुरु केला आहे. दरम्यान, कांबळे यांना कोणत्या कारणावरुन मारहाण झाली,
मारहाण करणार्या व्यक्ती कोण याबाबत तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर
आहे.
