। सातारा । दि.07 जून । मराठा आरक्षणावर आंदोलन करण्यापेक्षा सरकारनेच तत्काळ विधीमंडळाचे अधिवेशन बोलवावे. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करावे. जे होईल ते लोक पाहतील. आंदोलन करायची वेळ येते ही दुर्भाग्यची गोष्ट आहे.
मी नेहमी सांगत आलो आहे. सगळ्यांना एकत्र घेवून काम करा. तो कुठलाही पक्ष असला तरीही. जे आतापर्यंत झाले त्याची श्वेत पत्रिका काढा. मराठा आरक्षण सभागृहात स्वीकारल्यानंतर कोर्टात पाठवायची गरजच काय होती.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्यकर्त्यांनी नुसत्याच कोलांट्या उडया मारु नयेत, असा घणाघात करत ठाकरे सरकारवर खा.श्रीमंत छ. उदयनराजेंनी हल्लाबोल केला.जलमंदिर पॅलेस सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षण मिळाले नाही तर माजी आमदार नरेंद्र पाटील हे स्वत: बॉम्ब बांधून घेवून उडवून देण्याची भुमिका घेत आहेत. या प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले, एक्शनला रिएक्शन येणारच. कारण नसताना आंदोलन करण्यात उपयोग नाही. सरकारने तत्काळ अधिवेशन बोलवावे.
त्याच लाईव्ह टेलिकास्ट करावे. मीडियासमोर बोलायचे एक आणि करायचे वेगळे हे फार काळ टिकत नाही. प्रत्येकाला दोन फक्त दोन डोळे असतात पण समाजाचे डोळे त्यांच्याकडे असतात. उद्रेक झाला तर त्याला राज्यकर्ते जबाबदार राहतील. अधिवेशन बोलवा, दुध का दुध पाणी का पाणी होवून जावू द्या असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले.
