जागतिक पर्यावरण दिन: मोहिनी नगर, केडगाव येथे वृक्षारोपण करून साजरा

। अहमदनगर । दि.07 जून । अहमदनगर महानगरपालिका उद्यान विभाग व प्रभाग क्रमांक 17 चे विद्यमान नगरसेवक माजी सभापती मनोज दादा कोतकर यांच्या सहकार्याने मोहिनी नगर केडगाव येथील मोकळ्या भूखंडा मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

वृक्षारोपण ही मोहीम लोकसहभागातून करण्याचे व फक्त झाडे लावून फोटोसेशन न करता आयुष्यभर झाडांचा संवर्धन कसं करायचं याची शपथ परिसरातील नागरिकांनी घेतली. कोविडच्या जागतिक महामारी मुळे ऑक्सीजन अभावी अनेकांनी या वसुंधरा मातेचा निरोप घेतला.

मोहिनी नगर मधील नागरिकांनी पुढील पिढ्या करता व भविष्यकालीन पर्यावरणाचा विचार करून जन्मदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही आनंद प्रसंगी खर्च न करता त्याच्याऐवजी झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी मनापासून स्वीकारले आहे.

परिसरातील अनेकांनी आपला जीव कोविडमुळे गमावला त्या सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेषता या 1 वृक्ष 1 मित्र समितीचे सदस्य गिगाबाईट कॉम्प्युटरचे संस्थापक संचालक बाबासाहेब वायकर यांचे छोटे बंधू कै.सुनील वायकर यांच्या स्मरणार्थ वरील वृक्ष रोपन व संवर्धन मोहिमेचा वसा एकट्याने न करता सर्व परिसरातील नागरीकांना घेऊन पुढे चालण्याचा मानस केला आहे.

वृक्षारोपण केल्यानंतर पुढील वर्षी झाडांची वाढ किती झाली त्याचा विचार करून संगोपन करणार्‍या व्यक्तीस बक्षीस स्वरूपी रक्कम देण्याचा मानस समितीचे सदस्यांनी केला. वरील सर्व उपक्रम यशस्वी करण्याकरता प्रविण ठोंबरे,गणेश ठोंबरे,सागर बडे,अभिजित नलवडे, उमेश ठोंबरे, सुरेंद्र दराडे केतन कळमकर, प्रसाद ठोंबरे, फुंदे, भरत भंडारी, विजय शिंदे, रमण घोडेराव,  नवनाथ घोडे, परदेशी, घनश्याम बांडे, रामेश्वर ढगे बाबासाहेब वायकर यांनी परिश्रम घेतले.

वरील उपक्रम यशस्वी करण्याकरता डॉक्टर शांतीलाल कटारिया इंजिनीयर प्रसाद आंधळे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी अजय कोतकर ,बाळासाहेब कोतकर, विद्यमान नगरसेवक  मनोज दादा कोतकर उपस्थित होते.

 याप्रसंगी बोलताना मनोज कोतकर यांनी सांगितले परिसरातील नागरिकांनी असाच एकोपा ठेवल्यावर आम्हाला काम करण्यास आनंद वाटतो. सदर ओपन स्पेस 212/1 व 212/2 मध्ये एक  आधुनिक उद्यान करणार करण्याचा मानस केला आहे ,असे आश्वासन कृतिशील नगरसेवक मनोज दादा कोतकर यांनी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post