। नवीदिल्ली । दि.12 जून । पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. दरवाढीमुळे सर्वसामान्यांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागतोय हे आता निश्चित झाले आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ झाल आहे.
आता तेल उत्पादक कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरवाढीला ब्रेक दिल्यानंतर आज शुक्रवारी इंधनाच्या दरांत वाढ केली आहे. देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल 28-29 आणि डिझेल 28-30 पैशांनी महागले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 95.85 आणि 86.75 रुपयांवर पोहोचले असून मुंबईतही पेट्रोलच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईत पेट्रोल तब्बल 102.04 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलचे दर 94.15 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या धर्तीवर 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात होते. मात्र निवडणुकांचा काळ लोटल्यानंतर इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. दरम्यान, सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रतिलिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रतिलिटर इतका कर लागतो. तर राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते.