। अहमदनगर । दि.11 जून । अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्यांना अनुकंपा तत्वावर गट क मध्ये नेमणुक नियुक्ती पत्र 5 कर्मचार्यांंना बुधवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, आस्थापना प्रमुख अशोक साबळे यांच्यासह संजय ढोणे, सतीश शिंदे, प्रवीण ढोणे, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, शुभम वाकळे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, कर्मचार्यांनी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केले होते. त्या प्रस्तावास गती देवून या कर्मचार्यांना मनपा सेवेत नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. या कर्मचार्यांनी मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे
व मनपाचे हित जोपासावे तसेच नियमित व वेळेत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओंकार ढोणे, राहुल सूर्यवंशी, अश्विनी शिंदे, संकेत आढाव, ओंकार रायपेल्ली या कर्मचार्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
