। अहमदनगर । दि.21 जून । संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील रहिवासी असलेल्या एका आरोपीने आपल्या टोळीतील काही लोकांना हताशी धरून अकोले शहरातील शेखर नंदू वाघमारे याची महसूल खात्यात तलाठी पदावर नोकरी लावून देतो म्हणून तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.
माझी मंत्रालयातील मंत्र्याशी व अधिकार्यांशी खूप ओळख असून तुला महसूल विभागात आरक्षित कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावून देतो. त्यासाठी पैसे द्यावे लागतील. तू पैसे दे, तुला तलाठी पदावर नोकरी लावण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास अकोले शहरातील शेखर नंदू वाघमारे यास देऊन तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांना चुना लावल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमारे याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
फसवणूक झाल्यानंतर शेखर नंदू वाघमारे याने दिलेले पैसे परत मागितले असता शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात आरोपी नितीन गंगाधर जोंधळे (रा., कोकणगाव, ता. संगमनेर), विजयकुमार श्रीपती पाटील (रा., ललित बिल्डिंग नांदेड सिटी, सिंहगडरोड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.