। अहमदनगर । दि.07 मे । पारनेर येथील आमदार निलेश लंके यांच्या परिश्रमामधून भाळवणी येथे मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर (कोवीड सेंटर) ची उभारणी करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला अरणगाव (मेहराबाद) येथील साईन मेडिकचे संचालक शरद दळवी यांच्या हस्ते विविध वस्तु भेट देण्यात आल्या आहे.
यावेळी आमदार निलेश लंके यांच्या कार्याची माहिती करुन घेतली. भाळवणी येथील आरोग्य मंदिरास एन 95 मास्क बरोबरच विविध औषधांची भेट देण्यात आली. तसेच त्यांच्या या सामाजिक कार्याचे शरद दळवी यांनी तोंडभरुन कौतुक केले.
यावेळी आमदार निलेश लंके, साईन मेडिकलचे संचालक शरद दळवी, नानासाहेब दळवी, अशोक तरटे, आकाश दळवी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
