धारदार शस्त्राने पोटावर वार करुन एकाचा खून

। अहमदनगर । दि.26 मे । किरकोळ कारणातून दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा धारदार शस्त्राने पोटात वार करून खुन करण्यात आली. शरद दत्तात्रय वाघ (रा.पिंपळगाव उज्जैनी, ता.नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट ( सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. बाळासाहेब नामदेव वाघ (पिंपळगाव उज्जैनी) यांनी फिर्याद दिली आहे.

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी शिवारात ससेवाडी जाणारे रोडवर तलावाच्या जवळ काल सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये आणखी चौघे तरूण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी शिवारात ससेवाडी जाणारे रोडवर तलावाच्या जवळ घडलेल्या या खुन प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष आल्हाट, बन्सी आल्हाट आणि मारीया आल्हाट यांना पोलिसांनी अटक केली असून आरोपी मल्हारी आल्हाट याच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post