चाकूने वार करुन दहशत निर्माण करणारा ताब्यात

। अहमदनगर । दि.25 मे ।  तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सिध्दार्थनगर येथे चाकूने वार करुन दहशत निर्माण करणार्‍या आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हेने शाखेने कारवाई करून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष रामकृष्ण नवगिरे (वय 41 वर्षे रा. शिवाजीनगर, कल्याणरोड, अहमदनगर) असे आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 19 मे 2021 रोजी दिनेश मनोहर पंडीत (वय 36, रा. सुडकेमळा,नगर) हे त्यांच्या राहात्या घरी असताना अचानक त्यांच्या पाठीमागुन मोटार सायकलवर येवून विजय राजु पठारे (रा.सिध्दार्थनगर),

संतोष नवगिरे (रा. शिवाजीनगर, कल्याणरोड,नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारे याचा अनोळखी मित्र असे चोघे जण येवून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करुन व चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. बाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post