बाळ बोठेच्या हनीट्रॅप मालिकेची सखोल चौकशी करावी

अ‍ॅड.सुरेश लगड यांची 

पोलिस अधिक्षकांकडे मागणी



। अहमदनगर । दि.08 मे । रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने प्रकाशित केलेल्या हनीट्रॅॅप मालिका संदर्भात स्वतंत्र चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केली आहे. 



याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, जरे यांचे हत्याकांड होण्यापूर्वी बोठे याने तो काम करत असलेल्या दैनिकात हनीट्रॅप नावाची मालिका अनेक भागात प्रकाशित केली होती. 



ही मालिका बोठे याने कशासाठी लिहिले होती, त्याचा या पाठीमागचा उद्देश काय होता, या माध्यमातून कोणाला ब्लॅकमेलिंग करण्याचा उद्देश होता का? तसेच कुणाच्या संदर्भात हे लिखाण केले होते? याची खोलवर चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post