। अहमदनगर । दि.29 मे । सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोक्काच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केलाआहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नयन तांदळे टोळीस मोठा झटका दिला आहे.
महेश साहेबराव ससे ( वय 29 रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर ) यांचे दि 21डिसेंबर 2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी महेश ससे हे चहा पिण्याकरिता गेले असता त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून महेश ससे तसेच पोलिस विभागाची फसवणूक केली आहे. त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून भा.द.वि. कलम. 379, 467, 468, 471, 419, 420, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करत आहेत.
