आता मराठयांची फसवणूक करणं बंद करा ! ओबीसीकरणं हेचं मराठा आरक्षणं आहे ! : संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे

। औरंगाबाद । दि.25 मे । मराठ्यांना खोटी आश्वासन देऊनं चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार्‍या प्रत्येकाने या पुढे मराठा समाजाला फसवण्याच्या फंदात पडू नये. मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करूनं दीले जाणारे आरक्षणं हेचं घटनात्मक आहे. बाकीची चर्चा हा राजकीय बेबनाव असल्याचे संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी म्हंटले आहे.

पुढे ते म्हणाले की, कोणीही स्वतःच्या आमदारकी, खासदारकी च्या हव्यासातं चुकीच्या व खोट्या मार्गाची मांडणी करू नये. सर्वचं राजकीय पक्षातीलं मराठा आमदार, खासदार, मंत्री जाणूनं आहेत की मराठयांना फक्त ओबीसी मधीलं आरक्षणचं घटनात्मक आहे.

राजकीय अस्तित्वाच्या भीती पोटी हे बोलतही नाहीत आणि पुढही येतं नाहीत. संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाची मागणी व मांडणी अत्यंत कायदेशीर केली आहे. ती म्हणजे  मराठयाचं ओबीसीकरणं हेचं मराठा आरक्षणं हाचं घटनात्मक मार्ग आहे.

या पुढचा लढा संभाजी ब्रिगेड कोणी आले सोबतं तर त्यांच्या बरोबर अन्यथा संभाजी ब्रिगेड स्वतःच्या बळावर आणि हिंमतीवरं लढणार आहे. 
या पुढचा लढा संभाजी ब्रिगेड लढविणार आहे असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post