विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

। अहमदनगर । दि.30 मे ।  संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावच्या शिवारात सुभाष चंद्रभान आरोटे यांच्या विहिरीत पडलेल्या मादी बिबटयाला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुखरुप बाहेर काढल्याने जीवदान मिळाले.

देवकौठे येथील आरोटे यांच्या शेतातील शंभर फुट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबटया विहीरीत पडला होता. गुरूवारी सकाळी बिबटया विहिरीत असल्याचे आरोटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.

वनक्षेत्रपाल पारेकर, वनपाल डी. व्ही. जाधव, वनपाल एस. बी. ढवळे, वाय. आर. डोंगरे, वनरक्षक एस. एम. पारधी, वन कर्मचारी आर. आर. पडवळे, संतोष बोराडे,फुलसुंदर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिबटयास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. याप्रसंगी पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, नामदेव कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, अशोक मुंगसे, राजेंद्र मुंगसे, विलास मुंगसे, दादासाहेब मुंगसे, शिवाजी आरोटे, शरद आरोटे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post