दिल्लीहून गुजरातकडे जाणार्‍या गाडीत सापडले चार कोटी


। नवी दिल्ली । दि.24 मे । राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक गाडी जप्त केली. या  गाडीमध्ये  पोलिसांना  कोट्यवधी  रुपये सापडले आहेत. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग 8 वरून  ही  कार  गुजरातकडे  जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली.

सुमारे चार कोटी रुपये या गाडी मध्ये होते. हे रुपये हवालाचे असल्याची प्राथमिक शक्यता  व्यक्त  केली  जात  आहे.याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस सध्या दोघांची  चौकशी  करत  आहेत.  

डुंगपूर  जिल्ह्यातील   बिछीवाडा   पोलिसांनी   गाडीचा क्रमांक ‘डीएल8 सीएएक्स3573’गाडी  रोखली.  गाडीची  झाडाझडती घेतली असता  सदर    गाडीमध्ये  इतके पैस सापडले की ते मोजण्यासाठी संपूर्ण दिवस लागला.

गाडीत  सापडलेले पैसे मोजण्यासाठी बँकेतून मशीन्स मागवाव्या   लागल्या.   सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं  काम  सायंकाळपर्यंत सुरू होतं.  या  कारमध्ये तब्बल साडेचार कोटी रुपये जप्त करण्यात आले  आहेत.  

दिल्लीहून  गुजरातला  हवालाच्या  मार्गे  नेण्यात  होते,  अशी  माहिती  आता  समोर  येत  आहे.  पोलीस  उपअधीक्षक  मनोज  सवारिया  म्हणाले, सदर  रुपये  जप्त  करण्यात  आले  आहेत  आणि  आरोपींची  चौकशीही  केली  जात  आहे.  

प्राथमिक  माहितीनुसार  हे  प्रकरण  हवालाशी  संबंधित  असल्याचं  दिसून  येत  आहे.  पोलीस  सध्या  तपास  करत  असून,  आरोपींना  अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post