। अहमदनगर । दि.17 मे । जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार आता पोलिस प्रशासन सज्ज झाले असून विनाकारण फिरणार्यांकडून दंड वसुल करण्या बरोबरच त्यांची रस्त्यावरच अँटीजेल टेस्ट करण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर पोलिसांनी आज एकाच वेळी नाकाबंदी करत नियम मोडणार्यांवर कडक कारवाई केली. नगर शहरातील दिल्ली गेट, नेप्ती नका, आयुर्वेद कॉलेज रोड, माळीवाडा, सावेडी सह
शहरातील अन्य रस्त्यावर नाकाबंदी करून लॅाकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे व मोकाट फिरणार्यांना चांगलीच अद्दल घडविली जात होती.पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे तसेच अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक वाहनचालकाला थांबवून चौकशी करण्यात येत होती. सबळ कारण नसल्यास अँटीजेन टेस्ट करण्यात येत होती. शहरात करोनाचा आलेख काही प्रमाणात कमी होत असला तरी गर्दीमुळे तो पुन्हा वाढू नये याची खबरदारी घेतली जात असल्याचे पाहिला मिळाले.