ज्येष्ठ समाजसेवक, प्रबोधनकार प्रेमसुख तेजमल लोढा यांचे संथारा व्रतात निधन

। अहमदनगर । दि.17 मे । आपल्या जीवनात संत संगत झाली की, आपले जीवन पुर्णपणे बदलून जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरनीय प्रेमसुख तेजमल लोढा. लोढा यांनी आपल्या जिवन प्रवासात अनेक सामाजिक कार्य केली. 

 

जवळपास ४,५०० शाळा, कॉलेज, महाविद्यालये ग्रामसभेत जाऊन त्यांनी राष्ट्रीयएकात्मता, व्यसनमुक्ती, पर्यावरण, एड्स, आई-वडिलांचे ऋण इ. आदि विषयांवर प्रबोधनाचे  कार्य  केले. तसेच पारनेर तालुक्यात कै. खा.शंकररावजी काळे व कै. आ.वसंतरावजी झावरे पाटील यांच्या मार्फत नाला बल्डिंग, पाझर तलाव, बंधारे आदि कामात योगदान दिले.

 

ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पद भुषवले होते. मृत्यु समयी त्यांचे वय ७७ होते. भाजपा नेते वसंत लोढा यांचे ते  मोठे  बंधू  होत. ओम प्रॉपर्टीजचे संचालक संतोष लोढा यांचे ते वडिल होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post