महानगरपलिका दक्षता पथकांची धडक कारवाई

महानगरपलिका मनपा दक्षता पथकांची

धडक कारवाई ;  5 लाख 30 हजार

 200 रुपयांचा दंड वसूल  

 

। अहमदनगर । दि.17 मे । महानगरपालिकेने कोरोना संकटावर मात करण्यासाठी शहरात चार पथकांची नियुक्ती केली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर या पथकाची करडी नजर आहे. दक्षता पथकाने प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात 5 लाख 30 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 



दि.16 मार्चपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत सुमारे 5 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 200 रूपये दंड 281 नागरिक, 500 रूपये 138, 1 हजार 6, 2 हजार 1, 5 हजार 49, दहा हजार 13 जणांना केला आहे.  सदरची कारवाई ही शहरातील रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणारे, गर्दी करणारे नागरिक व कोरोना निर्बंधात दुकाने सुरु ठेवणार्‍या दुकानदारांवर करण्यात आली आहे.



परिमल निकम, शशिकांत नजान, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक राहुल साबळे, सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राजेश आनंद, भास्कर आकुबत्तीन, अमोल लहारे, किशोर जाधव यांनी आतापर्यंत 489 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post