नालेगावात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करा : गणेश कवडे

। अहमदनगर । दि.16 मे । गर्दी टाळण्यासाठी नालेगाव येथील शिवपवन मंगल कार्यालयात तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी सभागृहनेते तथा नगरसेवक गणेश (उमेश) कवडे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन केली आहे.


शहर व उपनगरामधील प्रत्येक केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून, कोरोना संक्रमण वाढण्याचा धोकाही वाढला आहे. शहरामध्ये माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्र, तोफखाना व बुरुडगाव रोड येथील जिजामाता आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.


गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांचे हाल होत आहेत. प्रत्येक केंद्रावर लसीचा अपुरा पुरवठा
होत असल्यामुळे नागरिकांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. महापालिकेने लसीकरण केंद्र नालेगाव येथील शिवपवन मंगल कार्यालयात सुरू केल्यास इतर केंद्रांवरील गर्दी कमी होणार असल्याचे कवडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post