। अहमदनगर । दि.16 मे । टपरीवर विसरलेले पैशाचे पाकीट आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले ही घटना वरवंडी गावच्या शिवारात हनुमंत नायकाच्या घाटाजवळ बस स्टॅन्ड जवळ घडली आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, की लताबाई सुदाम नागरे (वय 40 रा.पठारवाडी खांबे) यांचा भावासह संगमनेर इथून शिबलापुर मार्गे त्यांच्या घरी खांब येथे जात असताना लहान मुलाला चॉकलेट घेण्याकरिता बस स्टँडवरील टपरीवरून चॉकलेट घेतले.
परंतु पैशाचे पाकीट आतील दोन ग्रॅम सोन्याचे कर्णफुले व सतराशे रुपये रोखसह तेथेच विसरले. पाकीट विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी टपरीवर जाऊन पाकिट पाहिले असता पाकीट मिळून आले नाही.
याप्रकरणी पोलिसांनी लताबाई नागरे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत
