विनापरवाना सॅनिटायझर बनवून शासनाची फसवणूक करणार्‍यास अटक

। अहमदनगर । दि.08 मे । विनापरवाना बेकायदेशीररित्या सॅनिटायझर बनवण्याचे साहित्य बाळगून त्यापासून तयार केलेले सॅनिटायझर विक्री करण्याच्या उद्देशाने वळ बाळगणार्‍या एकस श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दत्त चौकात केली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दत्त चौक येथे राहणारा गुलाब विलास गुलाब तिखे याने बेकायदेशीररित्या विनापरवाना सॅनिटायझर बनवण्याचे साहित्य बाळगून त्यापासून सॅनिटायझर तयार केले सॅनिटायझर विक्री करण्याच्या 

 

उद्देशाने बाळू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला व पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी काष्टी येथील दत्त चौक येथे छापा टाकून विलास तिखे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दोन लाख 18 हजार 366 रुपयाचे सर्व साहित्य जप्त केले.



याप्रकरणी औषध निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी भादवि कलम 420 ड्रग्ज कॉस्मेटिक क्टर 1940 चे कलम 18 (सी),18 (ए) 27 (ल) (2) 28 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post