। अहमदनगर । दि.24 मे । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला घरातील सोन्या-चांदीचे दागिने व एलईडी टीव्ही असा ऐवज चोरून नेला. ही घटना नगर मनमाड रोड वरील एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील चेतना कॉलनी मध्ये घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की कोमल शंकर लकडे ( वय. 23 राहणार चेतना कॉलनी नवनागापूर अहमदनगर) यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोराने तोडून आत प्रवेश केला.
बेडरूममधील कपाटातील दोन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके,चांदीचे पैंजण, अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, आणि भिंतीवर असलेला एलईडी टीव्ही असा 22 हजार 600 रुपयाचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कोमल लकडे यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक दाताळ हे करीत आहेत.
