। अहमदनगर । दि.07 मे । शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टचे सहसचिव व माळीवाडा फुलारगल्ली येथील रहिवासी रामकृष्ण बाबुराव राऊत यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
स्व.राऊत यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते गेल्या 32 वर्षांपासून देवस्थानचे सहसचिव म्हणून काम पाहत होते. मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामात त्यांनी मोठे योगदान दिले. देवस्थानच्या उपक्रमात मार्गदर्शक म्हणून महत्वपूर्ण भुमिका बजावत.
परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यातही ते नेहमी सक्रिय असत. ते ‘नाना’ नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.