ट्रॅक्टर अचानक वळविल्याने अपघात ; एक ठार

। अहमदनगर । दि.30 मे ।  भरधाव वेगाने जाणारा ट्रॅक्टर अचानक उजवीकउे वळविल्याने समोरुन येणार्‍या टेम्पोची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराची धडक बसली. यामध्ये टेम्पो पटली होऊन टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याने मयत झाला. ही घटना नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाईचे येथील सब स्टेशन चौकात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अक्षय भिमराज करवटे (वय43, रा.वरकटवाडी शिरुर कासार, जि.बीड) हा त्याचा स्वराज्य टेम्पोने (क्र. एम.एच.09 बीसी 2750) औरंगाबादहून नगरकडे येत होता.
जेऊर बायजबाईकडून औरंगाबादकडे येणार्‍या भरधाव वेगातील ट्रॅक्टर चालकाने अचानक उजवीकडे ट्रॅक्टर वळवल्याने टेम्पोची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली.

या धडकेत टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोचालक अक्षय वरखडे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भीमराव वरकड यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक कावरे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post