हनीट्रॅप गुन्ह्याचा वाढतोय विस्तार : ’त्या’ अधिकार्‍याकडे केली होती तीन कोटीची मागणी


महिलेसह तिच्या चार साथीदारांवर 

गुन्हा दाखल


। नगर । दि.19 मे । नगर तालुक्यामधील जखणगाव येथील रॅकेट चालविणार्‍या महिलच्या हनीट्रॅमध्ये नगर शहरात नोकरी करणारा एक अधिकारीही अडकल्यची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महिलेसह तिच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पिडीत अधिकार्‍यानेच फिर्याद दिली आहे.



त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून पोलिसांनी संबंधितानी दिलेली फिर्याद नोंदवून घेतली आहे. आरोपींमध्ये पोलीस कर्मचार्‍यांच्या भावाचा समावेश असल्याने नागरिकांसह पोलीस वर्तुळातून मोठी चर्चा होत आहे.



नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका क्लासवन अधिकार्‍यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकार्‍याने हिंम्मत दाखवत अखेर ब्लॅकमेलर टोळीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाचंजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.



या अधिकार्‍याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरूणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्‍याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. त्यांच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ शूट केला होता. 



यामध्ये संबंधित तरूणीसह एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता.नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा.नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post