...मनपाने आणली त्यांच्या मानवी हक्कावर गदा ; किसान महासभेचा आरोप

शनिवारी आयुक्तांच्या 

घरासमोर उपोषण इशारा   

 
। अहमदनगर । दि.19 मे । कोरोना लॉकडाऊन निर्बंधांच्या माध्यमातून शहर हद्दीतील लहान मुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांचा सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर मनपाने गदा आणली असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान महासभेने केला आहे. 

मनपा हद्दीतील शेतमाल-भाजीपाला विक्री बंदी उठवून मार्केटरार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री गर्दीचे निरमन करत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली असून, याबाबत संयुक्त बैठक घेऊन त्वरीतनिर्णय न घेतल्यास आयुक्त शंकर गोरे यांच्या घरासमोर येत्या शनिवारी (22 मे) लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अखिल भारतीर किसान सभा व भारतीर कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांनी मनपा आयुक्त गोरे यांना मंगळवारी (18 मे) उपोषणाची नोटीस दिली. मनपा हद्दीतील शेतमाल भाजीपाला विक्री बंदी उठवून मार्केटरार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री गर्दीचे निरमन करत सुरू करावी व शहर हद्दीतील लहान मुले, गरोदर महिला, आजारी नागरिक रांच्रा सकस आहार खाण्याच्या मानवी हक्कावर गदा आणू नये, असे या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

दोन तास परवानगी द्या : मनपा आयुक्तांच्या निर्णयाने शेतकर्‍यांच्रा शेतमालाचे आर्थिक नुकसान होत आहे. व भाजीपाला-फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच रुग्णांसह नागरिकांच्रा आरोग्यासाठी फलाहार व पालेभाज्रा आवश्यक असताना त्यापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे, असा दावा चितळेरोड हातगाडी भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन संघटनेचे अध्यक्ष संजय  झिंजे व कार्याध्यक्ष अरुण खिची यांनी महापालिका कार्यालयात दिले असून , सरसकट फळ व भाजी विक्री बंदीचा आदेश मागे घ्यावा  तसेच फळ व भाजी विक्रीस परवानगी देताना दोन व्यवसायिकांमध्ये दहा फुटाचे अंतर ठरवून द्यावे, या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाचे फिक्स पॉईंट ठेवावे,  सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करावी असेही निवेदनाद्वारे सुचविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post