। अहमदनगर । दि.23 मे । भरधाव वेगात जाणार्या डंपरने चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेजबादारपणाने डंपर चालून पुढे चाललेल्या ट्रॅक्टरच्या नांगराला पाठीमागून धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
ही घटना आश्वी ते निमगाव जाळी रोडवर निमगाव शिवार संगमनेर येथे घडली. याबाबतची माहिती अशी की डंपर (क्रमांक एम एच 06 ए क्यू 97 84) चालकाने भरधाव वेगात डंपर चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत बेजबाबदारपणे डंपर चालून पुढे चालणार्या ट्रॅक्टर ( क्रमांक एम एच सोळा 1942 एफ 7942) च्या नांगराला पाठीमागून धडक दिली.
या धडकेत ट्रॅक्टर चालक संतोष नवनाथ जोंधळे ( वय. 30 रा.निमगाव जाळी ) याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तात्रय शिवनाथ जोंधळे (वय.30 रा.निमगाव जाळी) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार वाघमारे हे करीत आहेत.
