नगरला अवकाळी पावसाची हजेरी

। अहमदनगर । दि.15 एप्रिल । नगर शहर, उपनगर तसेच तालुक्याच्या काही ठिकाणच्या ग्रामीण भागात बुधवारी (दि. 14) सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.



शहर व परिसरात 10 ते 15 मिनिटे अवकाळी पाऊस पडल्याने सखल भागात बर्‍यापैकी पाणी साचले होते. अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून गारवा काही प्रमाणात निर्माण झाला होता.



बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. प्रचंड उकाडा निर्माण झाला. दुपारी 5 नंतर अवकाळी पाऊस पडेल असेच वातावरण निर्माण झाले होते.  सुसाट वारा वाहिल्यानंतर सायंकाळी 6.15 च्या सुमारास अवकाळी पावसाचे सरी पडल्या. नगर शहर व उपनगरात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस पडला असल्याचे वृत्त आहे. 



हवामान खात्याने आठ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. यापूर्वी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या होत्या. बुधवारी अवकाळी पाऊस 10 ते 15 मिनिटे झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस हा तसा द्गांक्षेसह अन्य फळबागांना हानिकारक ठरणारा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post