। अहमदनगर । दि.16 एप्रिल । नगर शहरात मोठ्या संखेने विद्यार्थी उच्चशिक्षण घेत शहराचे नाव देशात उंचावत आहे. उच्चशिक्षण घेऊन सक्षम होणारी नवी पिढी नगर शहरातच थांबावी यासाठी मी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
ज्या विद्यार्थ्यांनी देशातील उच्चनामांकित आयआयटी कॉलेज तसेच देशातील पहिल्या दहा नामांकन असलेल्या मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कालरा स्टडी सेंटर क्लासचे माजी विद्यार्थी आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेवक गणेश भोसले, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, किशोर डोंगरे, डॉ. सोमोध तिरुडकर, डॉ.अमोल कासवा, डॉ. गुरुशीन मक्कर, गुणवंत विद्यार्थी सानिका कानडे, मृण्मयी धोंडे, सायली पटवर्धन, शांभवी सापा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. किरण कालरा यांनी केले.
