बुरुडगाव रोडवर स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

। अहमदनगर । दि.18 एप्रिल ।  शहरातील बुरुडगाव रोडवर हॉटेल वैभव शेजारी असलेले स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि.15) पहाटे 3.30 च्या सुमारास केला.



बुरुडगाव रोडवर हॉटेल वैभव शेजारी स्टेट बँकेचे एटीएम असून ते फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. एएटीएम मशिन फोडता न आल्याने चोरट्यांनी एटीएमचे 50 हजार रुपये किंमतीचे एसएनजी लॉक तोडून चोरुन नेले.



याप्रकरणी बँकेचे मॅनेजर अजित राधाकिशन शेटे (वय 42, रा.नंदनवन नगर, भिस्तबाग) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post