। अहमदनगर । दि.23 एप्रिल । राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील गावाच्या पूर्वेस शिरगिरे आखाडा परिसरात असलेल्या गोदावरी उजव्या कालव्यात गावातीलच एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
महिलेचे नाव सारजाबाई मुरलीधर जाधव (वय 75) असून त्या तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होत्या. सारजाबाई जाधव यांचा घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
काल सकाळी वाकडी येथील शिरगिरे आखाडा परिसरात असलेल्या गोदावरी कालव्यात पुलालगत झूडपात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तो मृतदेह सारजाबाई यांचाच असल्याची नातेवाईकांनी खात्री केली. वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी घटनेची माहिती श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला दिली असता
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेचा मृतदेह शवंविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शारजाबाई या मनोरुग्ण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या अगोदरही त्या न सांगता घर सोडून गेल्या होत्या.