। अहमदनगर । दि.19 एप्रिल । केडगाव येथील प्रणव हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात आहे. या हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले.
आमदार पवार यांनी केडगावातील प्रणव हॉस्पिटलची पाहणी करून तेथे असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. यावेळी डॉ. प्रशांत व डॉ. शारदा महांडुळे यांनी त्यांना हॉस्पिटलमधील रुग्णांवर करण्यात येणार्या उपचारांची माहिती दिली. तसेच रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सांगितले.
त्यावर आमदार पवार म्हणाले, महांडुळे दाम्पत्य सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. त्यांनी कोरोना काळात रुग्णांवर चांगल्या पद्धतीने निदान केले. त्यांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात येईल. आमदार रोहित पवार यांनी केडगावच्या प्रणव हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी डॉ. प्रशांत व डॉ. शारदा महांडुळे उपस्थित होते.
