‘जनता कर्फ्यु’ ; आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी

। अहमदनगर । दि.19 एप्रिल । जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीला आळा घालण्यासाठी शनिवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी येत्या दि. 1 मे सकाळी सातपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यात नवे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 



या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचारावर निर्बंध जारी केले आहेत. सकाळी ते 11 या वेळेत काही आवश्यक बाबी सुरू ठेवण्यात आल्या असून त्यानंतर अत्यावश्यक सेवा सूची व्यतिरीक्त इतरांना घरातच बसावे लागणार आहे. काल रविवारी जिल्हाभरात या सुधारीत प्रतिबंधात्मक आदेशाला नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.

 

अत्यावश्यक सेवा आणि सुट असलेले प्रवर्गातील बाबींकरीता नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि सुट असलेले प्रवर्गातील काही बाबींवरही आता कडक निर्बंध लागू केले आहेत.


सकाळी 7 ते 11 या वेळेतच खालील गोष्टी सुरू राहतील -

 
* किराणा दुकान
* दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
* भाजीपाला विक्री (व्दार वितरण)
* फळे विक्री
* अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री
* कृषी संबंधीत सर्व सेवा दुकाने व पशुखाद्य विक्री
* पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅस विक्री
* पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहतूक, याकरीता डिझेल विक्री



तर या गोष्टी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे -

 
* हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल. मात्र होम डिलेवरी चालु राहील
* धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील.
* आठवडे बाजार पुर्णतः बंद राहतील.
* भाजीपाला, फळे बाजार बंद राहतील (फक्त व्दार वितरणास मान्यता देण्यात आली आहे)
* दारु दुकाने पुर्णतः बंद राहतील.
* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.
* चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.
* दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
* कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहती
* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील.
* स्टेडिअम, मैदाने पुर्णतः बंद राहतील
* विवाह समारंभास बंदी राहील.
* चहाची टपरी, दुकाने पुर्णतः बंद
* अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पुर्णतः बंद राहतील
* सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पुर्णतः बंद राहतील
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा  विषयक कार्यक्रम पुर्णतः बंद
* सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पुर्णतः बंद राहतील
* सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पुर्णतः बंद राहतील
* व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग, इव्हीनिंग वॉक बंद राहतील.
* बेकरी, मिठाई दुकाने बंद राहतील.

Post a Comment

Previous Post Next Post