धरणाच्या कालव्यात बुडून एकाचा मृत्यू

। अहमदनगर । दि.19 एप्रिल ।  गुरुवारी (ता. १५) सकाळी सहा वाजता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले.

 

शनिवारी (सकाळी) कालव्यातून अडीचशे क्यूसेकने पाणी सुरु होते. काळे आखाडा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक वृद्ध व्यक्ती पडले. कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

 

घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर आखाडा येथे रात्री साडेआठ वाजता मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. त्यांची वस्ती कालव्याच्या कडेला आहे.

 

त्यांना दृष्टीदोष होता. दुपारी घरातून बाहेर पडल्यावर ते नाहीसे झाले होते. दुपारी दोन वाजल्यापासून त्यांचे नातेवाईक शोध घेत होते.

Post a Comment

Previous Post Next Post