पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडली 60 किलो चांदी

। अहमदनगर । दि.20 एप्रिल । मनमाड-नगर महामार्गावरुन कोपरगावकडून शिर्डीच्या दिशेने जाणार्‍या कारची (क्र.एमएच 18 एजे 1020)  शहरातील साईबाबा काँर्नरवर नाकाबंदी दरम्यान, शनिवारी (दि.17)  रोजी रात्री झडली घेतली असता या झडतीमध्ये गाडीच्या डिक्कीमध्ये पांढर्‍या गोणीमध्ये सुमारे 30 लाख रुपयांची बेहिशोबी 60 किलो चांदी 463 ग्रॅम चांदीचे ठोकळे पोलिसांना आढळून आले.



सदरच्या कारवाई दरम्यान चांदीसह सुमारे 4 लाख रुपयांची कार असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हयातील राजगुरुनगर हुपरी येथील व्यापारी सौरभ अनिल पाटील (वय 26) याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोपरगाव शहरात सध्या ठिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचाकांना मास्क नसल्यास थांबवले जात असल्याने असाच प्रकार मास्क न घातल्याने समोर आला आहे. कोल्हापूरातुन शिर्डीकडे जात असताना साईकॉर्नर येथे पोलिसांनी मास्क न लावल्याने दंडात्मक कारवाईसाठी गाडी थांबवली यातुन असा प्रकार उघड झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post