। अहमदनगर । दि.10 एप्रिल । कोतवाली पोलीस ठाण्याचे समोरून बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल जवळ रस्त्याने पायी जाणार्या 70 वर्षीय महिलेशी अनोळखी तरुणांनी फसवणूक करून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की कलावती अशोक बोज्जा (वय 70 रा.पाचपीर चावडी, माळीवाडा, नगर) या बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल समोर रस्त्याने पायी जात असताना तिला तिघांनी अडवले आणि तुम्ही आमच्या मालकांना भेटा ते गरिबांना गहू आणि तांदूळ देतात असे म्हणून त्यांच्याबरोबर थोडे पुढे गेल्यावर तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा.
कारण आमचे मालक फक्त गरिबांनाच मदत करतात असे सांगितले. यांनी त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची बोरमाळ व पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र रुमालात मध्ये ठेवले.रुमाल जपुन ठेवण्याच्या निमित्ताने तिघांनी हातचलाखी करून सोन्याचे दागिने चोरून घेतले होते. आणखी तिघे पसार झाले.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कलावती बोजा यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 420, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्यात नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.