बाळ बोठेला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

। अहमदनगर । दि.24 मार्च । सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (25 मार्च) दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. बोठे याच्या पोलिस कोठडीची मंगळवारी मुदत संपत असल्याने त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.


न्यायाधीश उर्मिला बोर्‍हाडे यांनी बोठेच्या पोलिस कोठडीत वाढ केली. तपासी अधिकारी अजित पाटील यांनी बोठे यास तीन दिवस पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयासमोर केली.


आरोपीने गुन्हा घडल्यानंतर कोणाची व कोठे मदत घेतली याचा तपास बाकी आहे. आरोपीला नगरबाहेर तसेच हैदराबादला जाण्यासाठी कोणी मदत केली. हैदराबाद येथील मदत करणारी पी. अनंतलक्ष्मी व्यंकटाचारी सुब्बाचारी ही अद्याप फरार आहे. 


त्यासंदर्भात माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपीने अजून कोणाला सुपारी दिली होती का या संदर्भात माहिती घ्यायची आहे. त्यासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती.


दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यातून बरीचशी माहिती पोलिसांना समजली आहे. त्यामुळे आता कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद केला.

Post a Comment

Previous Post Next Post