विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत गणेश लांडगेने पटकावले रौप्यपदक

। अहमदनगर । दि.24 मार्च । ऑगस्ट 2021 मध्ये चेंगदू चायना येथे होणार्‍या जागतिक विद्यापीठ 2021 स्पर्धेसाठी अखिल भारतीय विद्यापीठाचा ज्युदो संघ निवडीसाठी 11 ते 15 मार्च दरम्यान राजर्षी शाहू महाराज विश्‍वविद्यालय कानपूर उत्तरप्रदेश येथे निवड चाचणी घेण्यात आली. यात 100 किलो खालील वजन गटात गणेश लांडगे याने रौप्य पदक पटकावले.


या निवड चाचणीत संपूर्ण भारतामधील प्रत्येक वजन गटातील उत्कृष्ठ खेळाडूंना बोलवले होते. त्यात नगरच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. सिद्धीबाग ज्युदो हॉलच्या आदित्य धोपावकर (न्यू लॉ कॉलेज) व गणेश जितेंद्र लांडगे (चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन पुणे) यांची निवड झाली होती.



कानपूर येथे झालेल्या निवड स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील दोन खेळाडूंना निवडण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे जागतिक विद्यापीठ स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येऊन त्यातून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.



त्यामुळे संभाव्य जागतिक विद्यापिठ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सिद्धीबाग हॉलच्या.गणेश लांगडे यांची निवड झाली आहे. भारतीय संघाच्या शिबिरात गणेश लांडगे यानी प्रथम क्रमांक मिळवल्यास भारतीय संघात निवड होईल त्यासाठी तो कसून सराव करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post