। अहमदनगर । दि.23 मार्च । भरधाव वेगातील मोटार सायकल मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला ही घटना नगर कल्याण रोड वरील धोत्रे शिवारातील वाघवाडी येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की गोरख रावसाहेब डोईफोडे हा मोटरसायकल ( क्र. एम एच 16 ए ए 8387 ) वरून ढोकीकडे जात असताना अज्ञात कारणे त्यांना धडक दिली.
या धडकेत गोरख भाऊ डोईफोडे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी रेवननाथ रावसाहेब डोईफोडे ( रा. ढोकी धरम वस्ती पारनेर ) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक मोडवे हे करीत आहेत.
