यशोदानगर येथे दरोडा टाकून एकास लुटले

। अहमदनगर  । दि.26 मार्च । 
चार मोटार सायकल वरून आलेल्या आठ जणांनी मोटरसायकल घडविला डोळ्यात मिरची पावडर टाकून लाकडी दांडके लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोटर सायकल कितीला ९० हजार रुपये बळजबरीने लुटून नेले.
 
 
 ही घटना पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर येथील भाजी मार्केट समोरील मोकळ्या मैदानात बुधवारी ( दि.२४ ) रात्री दहा वाजता घडली.
 
 
याबाबत अधिक माहिती अशी अमर देविदास बोरा ( वय २९ रा. तपोवन रोड हडको अनगर ) हे त्यांच्या सुजुकी एक्सेस मोटरसायकल ( क्र.एम एस  १६ पी सी ८०७८ ) वरून चौकात कडे जाऊन मनोज दूल्लम यांना भेटले त्यांच्याशी प्लॉट खरेदी विक्री संदर्भात बोलून त्यांचा मित्र राजू बोराडे बालाजी मंदिरामागे त्याचे घरी सोडले. 
 
परत त्यांचे पद्मा नगर येथील ऑफिस कडे जात असताना यशोदा नगर येथील मार्केटच्या मोकळ्या मैदानात नूतन मराठी शाळेच्या जवळून जात असताना त्यांच्यामागून अचानक चार मोटर सायकल वर आलेल्या त्यांना मोटरसायकल आडव्या लावल्या सर्वांचे तोंडाला कपडा बांधलेला होता बोरा यांचे जवळ येऊन
 
त्यांनी बोरा यास तू जास्त माजला आहेस काय असे म्हटले त्याच वेळेस दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली व इतरांनी लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच बोरा यांच्या मोटरसायकलवर दगड तो लाकडी दांड्याने मारून नुकसान केले मोटर सायकलच्या डिकितून  ९० हजार रुपये घेऊन पसार झाले.
 
 याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी  अमित बोरा यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम ३९५, ३४१, ३२३, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post