महापालिका कामगार युनियनचे बुधवारी बेमुदत धरणे आंदोलन

। अहमदनगर । दि.23 मार्च । महापालिका कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्यासाठी महानगर पालिका कामगार युनियनने बुधवारी दि. 24 मार्चपासून बेमुदत धरणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती युनियनचे कॉ. अनंत लोखंडे यांनी दिली आहे. आयुक्तांना निवेदनाद्वारे कामगारांचे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

आयुक्तानंा दिलेल्या निवदेनात म्हटले आहे का, लिपिक, टंकलेखन, सहायक स्वच्छता निरीक्षक, मुकादम या पदावर दोन वर्षापूर्वी पदोन्नती दिलेल्या  कर्मचार्‍यांचे पदोन्नती विषयक परिक्षाविधीन कालावधी संपुष्टात आला आहे. सरद कर्मचार्‍यांना पदोन्नती कायम केले बाबतचे अंतिम आदेश तात्काळ देण्यात यावे अशी मागणी लोखंडे यांनी आयुक्तांकडे केली.

महानगरपालिकेत कोरोनाचा प्रकोप वाढत असून नव्याने दोन दिवसापूर्वी मुख्यालयातील सामान्य प्रशासन व निवडणूक विभाग कार्यालय येथे 4 कर्मचारी तरदोन सहायक आयुक्त याचे कोरोना बाधित असल्याने जिल्हा परिषदेच्या धरतीवर सर्व विभागात कर्मचार्‍यांची 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post