। संगमनेर । दि.23 मार्च । शहर व तालुक्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी तालुक्यातील कुरण येथे मुजीब शेख यांच्या घरासमोर लग्न समारंभ सुरू होता.
या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक आर. ए. माळी यांनी पथकासह लग्नस्थळ गाठले.
समारंभात घालून दिलेल्या नियमापेक्षा जास्त गर्दी आढळल्याने आयोजक मुजीब शेखला १० हजारांचा दंड ठोठावला. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन केले.
