आठवडी बाजारात चोरी करणार्‍या दोघांना अटक

। अहमदनगर । दि.20 मार्च । अहमदनगर येथील भिंगार कॅम्प मधील शुक्रवार बाजार चोरी करणार्‍या आंतरराज्य येथील दोघांना भिंगार कॅम्प पोलीस पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडील चोरीचे 55  हजार रुपये किमतीचे 6  मोबाईल जप्त केले.


केलेल्या कारवाईत रायप्पा मधुर ( वय 26 राहणार कळवरा चिकमंगळूर कर्नाटक )  रमेश प्रसाद गोडे ( वय 23 राहणार आप्पा राहणार तीपा बुटरगुटा नुल्लर आंध्र प्रदेश ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आठवडी बाजारात चोरी केल्याची कबुली दिली. सत्तार पिर मोहम्मद ( राहणार नागरदेवळे अ.नगर) हे शुक्रवारी आठवडे बाजारात भाजी खरेदी करण्याकरिता गेले असता त्यांचा रेडमी कंपनीचा मोबाईल चोरी गेला.


याप्रकरणी त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील फिर्याद दिली या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना बाजारात दोन इसम संशयित रित्या वावरताना आढळून आले.  पोलिसांना पाहताच ते पळू लागले.तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता.


बाजारात चोरी करणारी अंतरराज्यीय ( कर्नाटक ) टोळी असल्याची माहिती मिळाली. गर्दीच्या ठिकाणी हातचलाखी करून मोबाईल व इतर महागड्या वस्तू तसेच चार चाकी गाडीची काच फोडून आतील मोबाईल व इतर महागड्या चीजवस्तू चोरी करण्याची या टोळीची कार्यपद्धती असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्या कडून 55 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल जप्त केले.


ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी,पोलीस हवलदार जी डी गोल्हार,पो ना राहुल द्वारके,पोलीस नाईक भानुदास खेडकर,पो ना राजेंद्र सुद्रिक, पोलीस कॉ्स्टेबल समीर शेख, एस बी तावरे,अमोल आव्हाड,चालक पोलीस कॉन्स्टेबल अरुण मोरे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post