जिल्हा प्राथमिक बँकेची गोंधळाची परंपरा कायम !

। अहमदनगर । दि.28 मार्च । जिल्हा प्राथमिक बँकेत गोंधळाची परंपरा कायम राहिली आहे. विरोधकांसह सभासदांना बोलून दिले जात नसल्यामुळे बँकेच्या सभेत गोंधळ झाला.


जिल्हा प्राथमिक बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजू राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विरोधकांसह सभासदांना बोलून दिले जात नसल्याने विरोधकांनी सभागृहात येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले.

विकास डावखरे, प्रविण ठुबे आदी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे म्हणाले की, आजची शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांचा पोरखेळ झालेला दिसला.

100 वर्षाची परंपरा असणारी बँक ताळेबंदच बनवाबनवीचा छापून सभासंदाच्या डोळ्यात धूळफेक करणे सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी रात्रीत अहवाल बदलावा लागतो, इतकी नामुष्की 100 वर्षात कधी झाली नाही.

1200 कोटीची बँक जशी घडयाळे खरेदी करण्यासाठी जसे गुजरातला गेले तसे ऑनलाईन सभेसाठी चांगले तंत्रज्ञान नगरमध्ये असताना थेट पुण्याला गेले यांना फक्त घोटाळे घालण्यासाठी बाहेरचे पुरवठादार लागतात.

कशातच पायपोस न राहिलेल्या सत्ताधार्‍यांनी आता मुदत संपलेली आहे. अजून पोरखेळ करुन बँकेची बदनामी करण्यापेक्षा पायउतार होऊन एकदाची निवडणूक घेऊन टाकावी किंवा डी डी आर यांनी बँकेवर प्रशासक नियूक्त करावा, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post