दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; दोघे फरार

। अहमदनगर । दि.28 मार्च ।  दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले, तर तिघे उसाच्या शेतातून फरार झाले.

यातील हमील पठाणला शनिवारी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री गणपती मंदिराजवळील समनापूर-पुणे बायपास येथे घडली.

न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. यातील हलीम अकबर पठाणला शनिवारी दुपारी अटक झाली.  दरोडेखोरांकडून 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिस नाईक विजय रामनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून विक्रम रामनाथ घोडेकर (20), अजित अरुण ठोसर (20), सर्फराज राजू शेख, (19), हलीम अकबर पठाण, तर फरार कलीम अकबर पठाण, असिफ शेख आदी 6 दरोडेखोरांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post