। अहमदनगर । दि.23 मार्च । शेत जमिनीत असलेल्या कुकुट पालन पत्र्याचे शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोराने 60 हजार रुपये किमतीचे मोटर स्टार्टर 450 फुट वायर चोरून नेली.
ही घटना बुधवारी (दि. 17 रात्री नऊ ते गुरुवार दि. 18 सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ) शिवारात गट नंबर 1249 मध्ये घडली.
याबाबत ची माहिती अशी की साहेबराव आनंद लोखंडे यांचे कुकूटपालन पत्र्याचे शेडचे कुलूप चोराने तोडून आतील मोटर स्टार्टर साडे चारशे फूट केबल व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी साहेबराव आनंदा लोखंडे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी भादवि कलम 457.380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.
