डिंभे माणिकडोह बोगद्यासाठी ३०० कोटींची तरतूद करा : खासदार विखे यांची लोकसभेत मागणी

। अहमदनगर । दि.23 मार्च । 'डिंभे धरण ते माणिकडोह या दोन प्रकल्पांना जोडणारा बोगदा ( Tunnel ) लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ३०० कोटींची तरतूद करावी,' अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत केली. '

 


कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरण व डिंभे कालव्याचे निर्माण झाले आहे. या डिंभे कालव्याचा विसर्ग १ हजार २४० क्यूसेक डिझाईन आहे. पण बऱ्याच वर्षापासून त्या कालव्याचे नूतनीकरण न झाल्याने साधारण ३५० क्‍युसेक पाणी त्यामधून जाते, व फार मोठ्या प्रमाणात सिंचनाचे नुकसान होत आहे,' अशी माहितीही विखे पाटील यांनी लोकसभेत दिली.

 

 'हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने १५ किलोमीटर डिंभे ते माणिकडोह यांना जोडणारा बोगदा ( Tunnel ) असा प्रस्ताव केला होता. ज्याला तीनशे कोटीची आवश्यकता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती पाहता हा प्रकल्प राज्य शासनाकडून होऊ शकत नाही. 

 

 त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी तीनशे कोटीची तरतूद करावी, जेणेकरून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल व दोन टीएमसी अतिरिक्त पाणी कर्जत पारनेर व श्रीगोंदा च्या शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल,' असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post