केडगाव येथून 72 वर्षीय वृद्ध बेपत्ता

। अहमदनगर । दि.24 मार्च । सायकल वरून चाकू व इतर वस्तूला धार लावण्याच्या कामासाठी राहत्या घरात निघून गेलेले 72 वर्षीय मनुउद्दीन इब्राहिम शेख ( रा. एकनाथ नगर केडगाव ) हे अद्याप घरी परतले नाही ही घटना सोमवारी (दि. 22 ) सकाळी सात वाजता घडली. 

 

याबाबत अयाज मनुऊद्दिन शेख यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली असून अधिक तपास पोलीस हवालदार बी एम इखे हे करीत आहेत. बेपत्ता मनुउद्दीन शेख यांची उंची 5 फूट, रंग -सावळा शरीर बांधा- सडपातळ, डोक्याचे केस काळे पांढरे, नाक सरळ, अंगात गुलाबी रंगाचा फुल बायाचा शर्ट, 

 

राखाडी रंगाची पँट, डोक्यात पांढर्‍या रंगाची टोपी, पायात स्लीपर चप्पल  सोबत घड्याळ व सायकल आहे  यांच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे क्रमांक 0241-2416117 पोलीस हवालदार इखे बी एम मोबाईल 9923600605 वर संपर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post