एटीएम मधून 18 हजार चोरणारा अटक

। अहमदनगर । दि.02 मार्च । एटीएम कार्ड चोरून कार्ड चालवून 18 हजार रुपये चोरणाऱ्यास भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक करून त्याच्या कडून चोरलेले 18 हजार रुपये जप्त केले.ही कारवाई शनिवारी ( दि.27 ) केली.


याबाबतची माहिती अशी की बाळासाहेब गावखरे ( रा.प्रियदर्शनी शाळेसमोर, पाथर्डी रोड ) यांचे एटीएम कार्ड 28 डिसेंबर 2020 रोजी चोरीला गेले होते.या प्रकरणी सौ.विजया बाळासाहेब गावखरे यांनी भिगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

 

चोरीच्या घटने नंतर एक महिन्याने चोरट्याने सुपा येथील एटीएम मधून 18 हजार रुपये काढून चोरले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बँके बरोबर पत्र व्यवहार करून डाटा मिळवला त्या डाटाचे तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेऊन आरोपी निष्पन केला. 

 

आणी सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेवरून हे कॉ.गोल्हार, पो ना रमेश वराट, संतोष अडसूळ ,राहुल द्वारके, अरुण मोरे यानी आदिनाथ रावसाहेब कार्ले (रा.चास ता.नगर ) यास अटक केली. 

 

त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्या कडून चोरलेले 18 हजार रुपये जप्त केले. पुढील कारवाई हे.कॉ.गोल्हार हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post