। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । हातचलाखी करून एटीएमधारकास फसवणूक एटीएममधून 24 हजार 835 रूपयांची रक्कम लांबविली. ही घटना बुधवारी भरदिवसा माणिक चौकातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये घडली.
टोपी घातलेला अनोळखी इसम सीसीटिव्ही फुजेटमध्ये दिसला असून त्याच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रदीपकुमार ब्रिजमोहलप्रसाद साव (वय 48, रा. झारखंड, हल्ली रा. कोतकर मळा, सोनेवाडी बायपास रस्ता) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
प्रदीपकुमार साव हे एटीएममध्ये असताना त्यांच्या पाठीमागील टोपी घातलेल्या अनोळखी इसमाने हातचलाखी करून साव यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांचा विश्वासघात केला तसेच एटीएममधून 24 हजार 835 रूपयांची रक्कम काढून घेतली. ही घटना बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घडल